रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६


क्रूर श्वापदे......

क्रूर श्वापदे मुक्त संचारती,
आहे इथे भयाण शांतता,
मरतात रोजच जगताना,
यातना त्यांच्या सोबती झाल्या.

बोथट झाल्या संवेदना ,
इथल्या प्रत्येक मनाच्या,
नसे कुणाला कुणाची चिंता,
जाणिवा इथे लावारिस झाल्या.

गुदमरतात इथे अगणित श्वास,
पेटतात देहाच्या चिता जितेपणी,
अबला देहाचे लचके,
तोडले जाताहेत निर्भयपणे.

होताहेत नित्य बलात्कार,
भयभयीत असे प्रमाणिकता,
उजळ माथी वावरताहेत बिनधास्त,
भ्रष्टचारच बहू तो  झाला शिष्टाचार.

शापित झाले जिणे रोजचे,
मरणयातना भोगती मनी,
 झाला आहे अभिमन्यू सत्याचा,
घेरला आहे असत्याच्या चक्रव्यूहात.

तरीही मी जगतो आहे
या स्वार्थी,असत्य,भ्रष्टाचारी दुनियेत
घेवून मनी विश्वास
तुझ्या न्यायाचा.

पुन्हा एकदा राम,कृष्ण,नरसिंह
होवून करशील निर्दालन
या सा-या रावाणांचा,
कंसांचा नि,
हिरण्यकश्यपूंचा.

सुवर्णविलास (40)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा